बुध्द पर कविता | Buddha Kavita In Marathi

 तथागत

बुध्द पर कविता | Buddha Kavita In Marathi

चिवरधारी कर्मयोगी पुरूषोत्तम अति थोर

काळोखावर मात करूनी धम्माची केली विभोर


धम्मचक्र प्रवर्तन करूनी केली क्रांती महान

बहुजन हिताय बहुजन सुखाय केला धम्म प्रचार


अनेक कर्मठ शरण येऊनी अतुल्य भिख्खू झाले

राजांचीही सिध्दार्था चरणी भक्ती अपरंपार


तथागताची दिव्य वचने सुवर्ण-रजतानी लिहले

मानस माझ्या गर्व वाटे येईल बुध्द धम्माला बहार


मंगलदायी कल्याणकारी येवो सूवर्णकाळ

बुध्द धमाच्या अंगीाकाराने सकलांचा उध्दार


अपराजीत वीर भगवंत विज्ञान त्यांच्या ठाई

श्रध्देने चरणी झुकतो माथा ते ज्ञानाचे भांडार

पुढे वाचा>>>

- अशोक गायसमुद्रे

Post a Comment

0 Comments