निसर्ग कविता | Nisarg Kavita | निवडुंग

 निवडुंग


ओसाड माळा वरती उभे काटेरी निवडुंग

माधाह गरे पाहु चला अंगोपांगी तरंग


असे  एकटे  दूर नसे साथ कोणची

मुखी असो काटे परी हृदयात प्रेमरंग


साथ त्याची काटेरी शोभा आहे निसर्गाची

ओठावर अलगद येतो चोखोबाचा अभंग


एकमेका जखडली पाने जणू जोडलेत मने

हृदय मस्त हर्षित होऊन तरारतो उमंग


फळातले माणिक मोती चाखती पाखरे

दान तुझं परोपकारी मानवानो व्हा रे दंग

पुढे वाचा>>>

- अशोक गायसमुद्रे

Post a Comment

0 Comments