सुखाची फुलवेल
मंदमंद फुलवेली सुगंधीत झाली
सुखाच्या फुलवेलीस बहार आली
संयमाच्या बुंध्याला
श्रमाचा आधार
सुखाच्या फांद्यांना
दु:खाची किनार
सोसील्या यातनांची फुले झाली
पानोपानी रंग आहे
सहनशील मनाची
त्यामुळे कळी खुलते
सुखी जीवनांची
धरतीच्या कृपेची प्रीत झाली
देवा चरणी फुले वाहू
जीवन अनुभवाने
मार्ग मिळे सकलांना
सत्कार्य हाताने
यश मिळण्यासाठीची रम्य उषा झाली
- अशोक गायसमुद्रे
.jpeg)
0 Comments