कर्तव्य
मानवतेचे हित साधण्या
जन्म तुला वरदान रे
प्रेमभाव अंतरी असावा
ही मातृभूमीची हाक रे
अवनीवरती भारतमाता
नररत्नांची खाण रे
बोध घ्यावा इतिहासाचा
असे पुण्यक्षेत्र महान रे
इथे जगावे सहिष्णुतेने
उचनिचता सोड रे
विज्ञानावर श्रध्दा ठेवून
पाखंडी तत्वे गाड रे
दीनांसाठी व्याकुळ होऊन
अन्यायाला ठोकर रे
प्रिय भारताच्या सुखासाठी
समतेचे मार्ग अंगिकार रे
- अशोक गायसमुद्रे

0 Comments