मन कविता मराठी | Marathi Kavita

 मन

मन कविता मराठी | Marathi Kavita

अनमोल आहे मन

वळण लाव तू मनाला

मंगलदायी जीवनासाठी

काबूत ठेव त्याला


हित जपावे इतरांचे

नित्य वाढेल बंधुभाव

सिद्धार्थाची अमृतवाणी

मनाचा जीवनावरती प्रभाव


मन हे कल्याणकारी रत्न

भीम बाबा समान आहे

इथे घडते शौर्य गाथा

तू चिंतन करूनी पाहे


कीर्तीच्या भव्य पताका

मनामुळे गगनी लहरल्या

सहिष्णुतेच्या मंगल रीती

ममतेने इथे बहरल्या


जर का बांधवांनी ठरवले

मनातली सोडावी जात

विषमतेला ठोकर मारू

नांदो समता भारतात

पुढे वाचा>>>

- अशोक गायसमुद्रे

Post a Comment

0 Comments