राजे शिवराय 🚩
शिवनेरी गडावरती सूर्य उगवला
माता जिजाऊ पोटी शिव नररत्न जन्मला
चहू दिशांत पसरलेला काळोख होता
शिवसूर्याच्या तेजाने देश प्रकाशला
रायरेश्वर मंदिरात घेतली प्रतिज्ञा थोर
शूर बाल मावळ्यांनी त्यांना होकार दिला
तळपली तलवार शिवबाची तोरणा गडावर
तोरणा सर केला विजयी ध्वनी दुमदुमला
एका पाठोपाठ त्यांनी अनेक गड सर केले
मावळ्यांचे बळ मिळाले तयांच्या पराक्रमाला
सहिष्णुता त्यांच्या ठायी जिजाऊने दिधली होती
समतेचे राज्य स्थापिले काळोख घालविला
त्रासलेल्या रयतेला शिवबांनी सुखी केले
गर्व वाटतो शिवरायांचा अवघ्या भारताला
स्थापिले हिंदवी स्वराज्य कार्य तडीस गेले
कळावे अवघ्या जनांस राज्याभिषेक केला
- अशोक गायसमुद्रे

0 Comments