प्रेमाची साथ घे रे
प्रेमाची साथ घे रे
पक्षी उडाले सारे
सूर्य तळपता ढळला
हातात हात दे रे
अर्धांगणी तुझी मी
जगण्याची देते हमी
लेकरांना फुटले पंख
ना येणार आपुल्या कामी
तारुण्य होते जेव्हा
झिजवलेस अंग तेव्हा
संसार केला सुखाचा
दुखवले कुणा ना केव्हा
असे अश्रू नकोस ढाळू
कर्तव्याची जाण पाळू
कळवळले हृदय माझे
आठवणी सर्व जाळू
सुख आहे बुध्द चरणी
जागी घुमते तचांची वाणी
वार्धक्य लाचार आहे
जीवनाची असे काहाणी
- अशोक गायसमुद्रे

0 Comments