भीममळा
मळ्यामध्ये भरला शाळू गच्च भरला
वाऱ्यासंगं शेव माझा भिरभिरला
पाखरांचा उडता मेळा
कणसांवर झाला गाेळा
मानवता मळ्यात माझ्या
आहे बाई भीममळा
गरगर गोफण फिरते
रंग भरला-
धनी माझं विहिरीवरी
मोटार चाले भिरीभिरी
ऊस केळी भाजीपाला
तरारते सरसरी
पाटातलं खळखळ पाणी
नाद भरला-
संत्री अन मोसंबीचे
वाफे भरविते
नारळी नि लिंबोनीला
पाणी खेळवते
काम करते लवकर
तान्हा झोपला-
मळा माझा हिरवागार
आहे सुखाचं आगर
भाग्यवान धनी माझा
आहे देशाचा आधार
पिकवते बुद्धधम्म
माझ्या भारताला-
- अशोक गायसमुद्रे

0 Comments